Charholi: वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधीलकी जपत सेवाभावी उपक्रम!

आमचे बंधुतुल्य, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व यशस्वी उद्योजक योगेशजी जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे वर्गमित्र राहुलजी भोसले यांनी चऱ्होली गावातील वैकुंठ रथासाठी ₹५१,०००/- (एक्कावन्न हजार रुपये) इतकी आर्थिक मदत देऊ केली.

“आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो,” या उदात्त भावनेतून मित्राच्या वाढदिवसानिमित्त वागेश्वर विद्यालयातील इंग्लिश मीडियम स्कूलला वॉटर प्युरिफायर सप्रेम भेट देण्यात आला. या स्तुत्य उपक्रमातून चऱ्होली गावातील नागरिकांसाठी मोलाचे योगदान देण्याबरोबरच वागेश्वर विद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांची स्वच्छ पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याचे पुण्यकार्य घडले.

वाढदिवस केवळ जल्लोषात साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा हा आदर्श खरोखरच कौतुकास्पद आहे. आनंदाच्या क्षणांना समाजसेवेची जोड देत इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी अनुकरणीय आहे.

या प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. अर्चनाताई राजेश सस्ते, वागेश्वर विद्यालयाच्या प्राचार्या प्रीती दबाडे मॅडम, चव्हाण सर, पंडित तात्यातापकीर, राजेश सस्ते, सुनील पठारे, देवेंद्र तापकीर, श्रीकांतजी तापकीर, अक्षय देवकर, आयुष सस्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व यशस्वी उद्योजक योगेशजी जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात, थाटामाटात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी दिलेले योगदान हेच खऱ्या आनंदाचे आणि समाधानाचे प्रतीक आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी राहुलजी भोसले आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट, दमदार आमदार मा. महेशदादा लांडगे यांच्या वतीनेही योगेशजी जगताप यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

त्यांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान, समृद्धी, भरभराट आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तरोत्तर यश लाभो, तसेच त्यांच्या हातून समाजहिताची अशीच लोकोपयोगी कार्ये घडत राहोत, हीच सदिच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *