Vision Vanessa मधील आलिशान 3BHK फ्लॅटमध्ये दसऱ्याच्या महूर्तावर कलश पूजन संम्पन्न

दसऱ्याचा शुभमुहूर्त साधत मोहेकर परिवाराने प्राधिकरण परिसरातील व्हिजन व्हेनेसा (Vision Vanessa) या आलिशान गृहप्रकल्पातील प्रशस्त 3 BHK फ्लॅटमध्ये कलशपूजन केले.

स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल मोहेकर परिवारासाठी आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण ठरले. तसेच, स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील कुटुंबांसाठीही हा एक प्रेरणादायी प्रसंग ठरला..

योग्य निर्णयातून साकारले घराचे स्वप्न!

घर खरेदी करताना परिसराची निवड, बजेट, बांधकाम व्यावसायिकावरील विश्वास आणि कायदेशीर बाबींची खातरजमा या गोष्टी महत्त्वाच्या असतात. या सर्व बाबींचा विचार करून मोहेकर परिवाराने प्राधिकरण-रावेत परिसरातील Vision Vanessa या गृहप्रकल्पाची निवड केली.

दसऱ्यासारख्या शुभदिनी आपल्या हक्काच्या घरात कलशपूजन केल्याने या निर्णयाला आनंदाची आणि मंगलमय सुरुवात मिळाली.


दोन एकर परिसरात 176 सदनिकांचा गृहप्रकल्प!
प्राधिकरणातील मोक्याच्या ठिकाणी विकसित होत असलेल्या Vision Vanessa या गृहप्रकल्पाचा विस्तार सुमारे दोन एकर परिसरात असून, येथे 2 आणि 3 BHK सदनिकांचे पर्याय उपलब्ध आहेत. एकूण 176 सदनिकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात सध्या मोजक्याच सदनिका शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे. रहिवाशांच्या सोयीसाठी प्रकल्पात 30 हून अधिक आधुनिक ॲमेनिटीज उपलब्ध आहेत.

वास्तू खरेदीसाठी योग्य माहिती महत्त्वाची!

स्वतःचे घर खरेदी करणे हा प्रत्येक कुटुंबासाठी आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे घर निवडताना प्रकल्पाचे स्थान, उपलब्ध सुविधा, आर्थिक नियोजन आणि कायदेशीर बाबींची पडताळणी करणे आवश्यक आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोहेकर परिवाराने केलेले कलशपूजन हे त्यांच्या नव्या गृहप्रवासातील आनंददायी पर्व ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *